Saturday, August 25, 2007

॥ साजणवेळ ॥

॥ साजणवेळ ॥
" पाऊस कधीचा कोसळतो,
थेंब टपोरे मातीवरती,
रंग मनीचा दंहिवरतो.......................................॥धृ॥

सय येता साजणवेळी ,
नयनांसी लागे पागोळी.
अंतरात आसुसलेल्या,
एक क्षीण कोपरा, काळोखी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥१॥

अंगणातल्या तरूवेली,
आलिंगती अधीर मनी.
झटकूनी भान देहाचे,
ऊठे शिरशिरी, त्या काळोखी ॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥२॥

चिंब भिजल्या पानोपानी,
घेई वारा तान विराणी.
ओले राघू आणिक मैना,
फांदीवर ओल्या, त्या काळोखी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥३॥

जलधारांतुन पाशवी,
नग्न गारवा ये धावूनी.
सैलावल्या पदराआडूनी,
देहास शहारा , त्या काळोखी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥४॥



कंच हिरव्या माळरानी,
(ये) धून ओली साजणवेडी.
त्या नजरेच्या वाटेवरती,
पायवाट धुंद , त्या काळोखी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥५॥

घेवूनी कवेत काळोख,
उर फोडूनी ये काळोख.
देही कल्लोळ कल्लोळ,
रात बेभानली , त्या काळोखी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥६॥

"पाऊस कधीचा कोसळतो,
थेंब टपोरे मातीवरती.
रंग मनीचा दंहीवरतो॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥ध्रु॥