Friday, August 24, 2007

II काजळकाळ II


॥ काजळ काळ ॥

किर्र जाहल्या सांजा तिन्ही, तरुवरांच्या पायतळी

भान हरपूनी विणते सृष्टी , काळोखाची जाळी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰ १


कातरवेळेवरीच उठती तरंग अंधाराचे,

हूरहूर अनमिक ह्रुदयी ओझे रिक्तपणाचे॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰२


स्तब्ध शांतता लेवून आली, निशब्द आर्त विराणी

पानापानातुन प्रकटली अलगद चंदेरी वाणी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰३


रातकिड्यांचे चाळ बांधुनी, रुखातळी मग नाच नाचुनी

उरात उमटली निशाराणीच्या,अंधाराची प्रकाशगाणी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰४


अलगद् आपुल्या काजळ हाती,रिक्तपणा कवळूनी टाकी

भारुनी ह्रुदया प्रकाशकणांनी,पापणीत उतरे ती निशा शहाणी॰॰॰॰॰५


अनुराग ( माझी कविता)