
आलोकाच्या पदराआडूनी,
हाती चंद्रदीप घेउनी,
पहा ती आली परतोनी........
दिनमणी तो पिता तियेचा
कांठावरती वसुंधरेच्या
गेला जगतावरी सांडूनी
पहा ती आली परतोनी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥१॥
व्याकूल दुहीता पित्यावेगळी
धुंडीतसे दशदीशा बरसूनी
अधीर मनी होउन भेटण्या
पहा ती आली परतोनी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥२॥
फूलवित चांदण्या मनोमनी
उल्काश्रूंचे मग सडे पाडूनी
आक्रमेल ती मार्ग एकली
हाती चन्द्रदिप घेउनी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥३॥
पूर्वेला मग उधळूनी लालीमा
स्वनयनांचा आरक्त महीमा
ठेवून साक्षी मग शुक्राला
विसांवेल ती पित्या भेटण्या
वसुंधरेच्या काठावरती
हाती चन्द्रदीप घेउनी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥४॥
जगत्-पालक तो पिता तियेचा
उसळत धुरळा आलोकाचा
मंद हासुनी,प्रकाश-वदने तिजला
घेईल अलगद् कवेत अपूल्या॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥५॥
श्रांत-क्लांत ती पित्रुअंकावर
खगरवांची अंगाई ऐकत
प्रकशात ती झोपी जाईल
हातीचा चंद्रदीप विझवूनी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥६॥
वसुंधरेच्या कठावरती ती निशा येईल परतोनी
अनुराग (माझी कवीता)