Saturday, August 25, 2007

II .............रात्र श्रावणाची II


हलकेच् श्रावणाची , सर

भिजवून गात्र गेली.

दडवून सुर्य सारा,

झाकोळून आस गेली.....................१


आता कुठे जराशी,

डॉळ्यांस रात्र चढली

हलकेच पापणीत,

सर श्रावणी बरसली.........................२


जागल्या आशा-निराशा,

वेढती सरसावूनी.

कण्हत, वेदनेची सर,

श्रावणी बरसली.................................३


घेऊ कसा? कुठॅ मी ????

वेध ह्या वेदनेचा !!!!!!!

तोडून बंध सारे,

मन कोरडे कधीचे..............................४


संपॅल का कधी, ही

मेहफील वेदनेची ?????

बरसून ये पुन्हा तू,

होऊन रात्र श्रावणाची,,,,,,,,,,,,,,,

होऊन रात्र श्रावणाची...........................


अनुराग.......(माझी कवीता)

॥ साजणवेळ ॥

॥ साजणवेळ ॥
" पाऊस कधीचा कोसळतो,
थेंब टपोरे मातीवरती,
रंग मनीचा दंहिवरतो.......................................॥धृ॥

सय येता साजणवेळी ,
नयनांसी लागे पागोळी.
अंतरात आसुसलेल्या,
एक क्षीण कोपरा, काळोखी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥१॥

अंगणातल्या तरूवेली,
आलिंगती अधीर मनी.
झटकूनी भान देहाचे,
ऊठे शिरशिरी, त्या काळोखी ॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥२॥

चिंब भिजल्या पानोपानी,
घेई वारा तान विराणी.
ओले राघू आणिक मैना,
फांदीवर ओल्या, त्या काळोखी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥३॥

जलधारांतुन पाशवी,
नग्न गारवा ये धावूनी.
सैलावल्या पदराआडूनी,
देहास शहारा , त्या काळोखी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥४॥



कंच हिरव्या माळरानी,
(ये) धून ओली साजणवेडी.
त्या नजरेच्या वाटेवरती,
पायवाट धुंद , त्या काळोखी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥५॥

घेवूनी कवेत काळोख,
उर फोडूनी ये काळोख.
देही कल्लोळ कल्लोळ,
रात बेभानली , त्या काळोखी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥६॥

"पाऊस कधीचा कोसळतो,
थेंब टपोरे मातीवरती.
रंग मनीचा दंहीवरतो॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥ध्रु॥

Friday, August 24, 2007

II काजळकाळ II


॥ काजळ काळ ॥

किर्र जाहल्या सांजा तिन्ही, तरुवरांच्या पायतळी

भान हरपूनी विणते सृष्टी , काळोखाची जाळी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰ १


कातरवेळेवरीच उठती तरंग अंधाराचे,

हूरहूर अनमिक ह्रुदयी ओझे रिक्तपणाचे॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰२


स्तब्ध शांतता लेवून आली, निशब्द आर्त विराणी

पानापानातुन प्रकटली अलगद चंदेरी वाणी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰३


रातकिड्यांचे चाळ बांधुनी, रुखातळी मग नाच नाचुनी

उरात उमटली निशाराणीच्या,अंधाराची प्रकाशगाणी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰४


अलगद् आपुल्या काजळ हाती,रिक्तपणा कवळूनी टाकी

भारुनी ह्रुदया प्रकाशकणांनी,पापणीत उतरे ती निशा शहाणी॰॰॰॰॰५


अनुराग ( माझी कविता)

Thursday, August 23, 2007

निशागान



आलोकाच्या पदराआडूनी,

हाती चंद्रदीप घेउनी,

पहा ती आली परतोनी........


दिनमणी तो पिता तियेचा

कांठावरती वसुंधरेच्या

गेला जगतावरी सांडूनी

पहा ती आली परतोनी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥१॥

व्याकूल दुहीता पित्यावेगळी

धुंडीतसे दशदीशा बरसूनी

अधीर मनी होउन भेटण्या

पहा ती आली परतोनी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥२॥

फूलवित चांदण्या मनोमनी

उल्काश्रूंचे मग सडे पाडूनी

आक्रमेल ती मार्ग एकली

हाती चन्द्रदिप घेउनी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥३॥

पूर्वेला मग उधळूनी लालीमा

स्वनयनांचा आरक्त महीमा

ठेवून साक्षी मग शुक्राला

विसांवेल ती पित्या भेटण्या

वसुंधरेच्या काठावरती

हाती चन्द्रदीप घेउनी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥४॥

जगत्-पालक तो पिता तियेचा

उसळत धुरळा आलोकाचा

मंद हासुनी,प्रकाश-वदने तिजला

घेईल अलगद् कवेत अपूल्या॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥५॥

श्रांत-क्लांत ती पित्रुअंकावर

खगरवांची अंगाई ऐकत

प्रकशात ती झोपी जाईल

हातीचा चंद्रदीप विझवूनी॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॥६॥

वसुंधरेच्या कठावरती ती निशा येईल परतोनी


अनुराग (माझी कवीता)